अमिताभ बच्चन व डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे बोगस ई पास

सिमला : देशातील विविध राज्यात कोविडच्या प्रादुभावामुळे प्रवासासाठी ई पास आवश्यक करण्यात आला आहे. या पासचा विविध राज्यात काळाबाजार सुरु असल्याचे देखील उघड होत आहे. हिमाचल प्रदेशात प्रवेश करण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन व अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे दोन बोगस ई पास तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

दोन्ही ई पासवर एकच मोबाईल क्रमांक व एकच आधार नंबर नमुद करण्यात आला आहे. सिमला पुर्व पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे. हिमाचल प्रदेशात प्रवेशासाठी 26 एप्रिलपासून ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. खोटी माहिती सादर करत ई पास काढले जात असल्याची बाब या घटनेतून उघड झाली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here