पाचवी ते आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षा लांबणीवर

मुंबई : राज्यात कोरोनाचा सुरु असलेला फैलाव लक्षात घेता पाचवी ते आठवी शिष्यवृत्तीच्या परिक्षा लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली आहे. पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा आणि आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा दिनांक 23 मे 2021 रोजी राज्यात सर्वत्र एकाच दिवशी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा कहर वाढतच असल्यामुळे या परिक्षा लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

आमदार कपिल पाटील यांनी या परिक्षांबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. या पत्रानुसार सदर परिक्षा रद्द करण्याच्या सुचना निर्गमीत करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला देण्यात आले होते. त्यानुसार शिष्यवृत्तीच्य या दोन्ही परिक्षा लांबणीवर टाकण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी आज जाहीर केले. या निर्णयामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना दिलासा मिळणार असल्याचे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे म्हटले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here