पानटपरीतून टीव्ही चोरणारे दोघे अटकेत

जळगाव : जळगाव शहरातील खोटे नगर रिक्षा स्टॉप नजीक काही दिवसांपुर्वी बंद पान टपरी फोडून त्यातील टीव्हीसह रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेतील दोघा आरोपींकडून त्यांनी चोरुन नेलेला टीव्ही हस्तगत करण्यात आला आहे. भरत संजय सपकाळे (21) व शाम सोपान कळसकर (21) दोघे राहणार समता नगर धामणगाव वाडा जळगाव अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. या चोरीच्या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेतील दोघा आरोपींना पुढील तपासकामी जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. दादाभाऊ पाटील, हे.कॉ. प्रदीप पाटील, जयंत चौधरी, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, सचिन पाटील, अशोक पाटील यांच्या पथकाने या तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here