जळगाव – शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत गो मांस विक्री करणा-या विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 55 किलो गोमांस जप्त करण्यात आली आहे. कुरेशी सज्जाद खान युसुफ असे इस्लामपुरा भागात राहणा-या व कारवाई करण्यात आलेल्या विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्या कब्जातून 55 किलो गोमांस सह 19 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शनीपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकातील महिला पोलिस उप निरीक्षक पुजा पांढरे, परिविक्षाधिन पोलिस उप निरीक्षक संतोष खेडेकर, हे.कॉ. विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, शशिकांत पाटील, रविंद्र इंधाटे, पो.कॉ. अमोल वंजारी, पराग दुसाने, गजानन वाघ, निलेश घुगे, नवजीत चोधरी व सतिष भारुळे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.






