पती पत्नीचा आगीत होरपळून मृत्यू

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा या गावी मध्यरात्री लागलेल्या आगीत पती पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उत्तम श्रावण चौधरी (47) आणि वैशाली उत्तम चौधरी (44) अशी आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्यांची नावे आहेत.

मध्यरात्री चौधरी दाम्पत्य घरात झोपलेले होते. त्यावेळी रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक घराला आग लागल्याचे त्यांना जाणवले. रस्त्याने ट्रक घेऊन जाणा-या एका ट्रक चालकास या आगीचे दृश्य दिसले. त्याने गावातील लोकांना याबाबत झोपेतून उठवून माहिती दिली. गावक-यांनी देखील विनाविलंब आगग्रस्त घराकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे गावक-यांना घरात जाण्यास त्रास झाला. अखेर दरवाजा तोडून गावक-यांनी आत प्रवेश मिळवला. मात्र तोपपर्यंत पती पत्नीचा मृत्यू झालेला होता. आग नेमकी कशी लागली याचे वृत्त समजू शकले नाही. चौधरी दाम्पत्यांना विवाहीत मुलगी व एक मुलगा आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here