कुमार चिंता यांची अक्षयतृतीयेला जुगारावर धडक कारवाई

जळगाव : अक्षयतृतीयेच्या दिवशी जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातो हे लक्षात घेत जळगाव उप विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने विविध कारवाया केल्या. यात रामानंद नगर व जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील आव्हाणे येथील जुगारावरील धाड लक्षणीय ठरली.

तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील आव्हाणे या गावी सरपंच पतीसह एकुण 12 जणांवर जुगाराची कारवाई करण्यात आली. या धाडीत 3 लाख 36 हजार 530 रुपये रोख, 11 मोबाईल व 4 मोटार सायकली जप्त करण्यात आले आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील हुडको परिसरातील धाडीत 31 हजार 970 रुपये रोख, 4 मोबाईल व 9 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. एमआयडीसी शिरसोली भागातील धाडीत 1 लाख 59 हजार रुपये रोख, 3 मोबाईल व तिन जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील धाडीत 23 हजार 670 रुपये रोख, 2 मोबाईल व 6 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. एमआयडीसी व्ही सेक्टर भागातील धाडीत 14 हजार 516 रुपये रोख, 4 मोबाईल व 7 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील शिव कॉलनी भागातील धाडीत 12 लाख 80 हजार 820 रुपये रोख, 4 फोर व्हिलर, 3 मोटार सायकली, 7 मोबाईल व 7 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. याशिवाय दोन ठिकाणी प्रोव्हिबीशन कारवाई करण्यात आली असून त्यात 1650 रुपये रोख व 1 जण ताब्यात घेण्यात आला आहे.

या कारवाईत सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्यासह सहायक फौजदार भटू नेरकर, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, कमलेश नगरकर, मनोज दुसाने, किरण धमके, विजय काळे, राजेश चौधरी, कैलास सोनवणे, पोलिस नाईक सुहास पाटील, महेश महाले, सुहास पाटील, पो.कॉ. रविंद्र मोतीराया, प्रसाद जोशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here