आमदाराच्या पत्नीचा मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : पुलाच्या कठड्यावर चढलेल्या व आत्महत्येचा विचार करणा-या महिलेचे मुंबई वाहतुक पोलिसाने प्राण वाचवले आहेत. मात्र ती महिला आमदाराची पत्नी असल्याचे उघड झाले आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणा-या त्या महिलेच्या आमदार पतीचे नाव समजू शकले नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ढगे आडनावाचे पोलिस कर्मचारी वाहतुक नियोजन करण्यात मग्न होते. त्यावेळी एक महिला पुलाच्या कठड्यावर चढली असून रडत असल्याची माहिती त्यांना एका मोटार सायकल चालकाने त्यांना दिली. परिस्थितीचे भान आणि कौशल्य वापरत त्यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने या घटनेची माहिती नियंत्रण कक्षात व मानखुर्द पोलिस स्टेशनला कळवली. ढगे यांनी त्या महिलेसोबत बोलणे करत कौशल्य वापरत तिला खाली उतरण्यास भाग पाडले. त्या महिलेला मानखुर्द पोलिस स्टेशनला गोडीगुलाबीने आणले गेले. आपण कौटूंबीक कलहातून आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचे तिने चौकशीत सांगितले. त्यानंतर त्या महिलेला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here