वाढदिवसानिमीत्त जमले सर्वच दर्दी ! ——– खाकीच्या कारवाईने ओसरली गर्दी !!

जळगाव : कोविड 19 वर नियंत्रण आणण्याकामी जिल्हाधिका-यांच्या आदेशाने जळगाव शहरासह जिल्ह्यात विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमावर देखील बंदी घालण्यात आली आहे. वाढदिवसानिमीत मित्रपरिवार जमा करुन गर्दी करत कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील हनुमान नगर अयोध्या नगर भागात अनिल घुले यांचा 28 मे रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमीत्त रात्री आठ वाजेच्या सुमारास सुरु असलेल्या कार्यक्रमात गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक वाढदिवस सुरु असलेल्या ठिकाणी दाखल झाले. याठिकाणी सुमरे 25 ते 30 जणांची गर्दी जमा झाली होती.

जिल्हाधिका-यांनी निर्गमीत केलेल्या कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल लक्ष्मण घुले (रामेश्वर कॉलनी), सुनिल लक्ष्मण घुले, रुपेश सोनार (कांचन नगर, जळगाव), सोनुसिंग बावरी (तांबापुरा, जळगाव), दत्तु थोरवे (रामेश्वर कॉलनी, जळगाव), मयुर वाणी, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव, संदीप उर्फ राधे शिरसाठ (रामेश्वर कॉलनी, जळगाव), सिकंदर पटेल (फातेमा नगर, जळगाव), पप्पु पांडोळकर (रामेश्वर कॉलनी, जळगाव), विक्की पाटील (अयोध्या नगर, जळगाव), अक्षय पाटील (अपना घर कॉलनी, अयोध्या नगर, जळगाव), दिपक तरटे (नागसेन नगर, जळगाव) व इतर 10 ते 12 जणांविरुद्ध पो.कॉ. सतिष गर्जे यांच्या फिर्यादीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, पो.कॉ. सुधीर सावळे, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. योगेश बारी आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here