120 कोटीचे चरस, आरोपींवर दाखवला तरस ! पोलिसांची निलंबन कारवाई मात्र ठरली सरस !!


पुणे : अटकेतील आरोपींवर तातडीने कारवाई करण्याऐवजी त्यांना हॉटेलात मुक्कामी ठेवत वेळ घालवल्याचा ठपका ठेवत पुणे लोहमार्ग वरिष्ठ पोलिस अधिका-यासह आठ कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. 120 कोटी रुपये किंमत असलेले 34 किलो वजनाचे चरस बाळगत रेल्वेने प्रवास करणा-या दोघांना पुणे लोहमार्ग पोलिसांनी सन 2020 मधे ताब्यात घेत अटक केली होती. अटकेतील दोघे जण हिमाचल प्रदेशातून पुणे येथे चरस घेऊन आले होते. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजीत करण्यात आलेल्या पार्ट्यांमधे या चरसचा पुरवठा केला जाणार असल्याचे त्यावेळी सांगितले जात होते.

कालांतराने पुणे लोहमार्ग पोलिसांकडून हा तपास एटीएसकडे वर्ग झाला. एटीएसने आरोपींचा ताबा घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत धक्कादायक प्रकार उघड झाला. पुणे लोहमार्ग पोलिसांनी आरोपींना हॉटेलात मुक्कामी ठेवत वेळ दवडला व कारवाईला विलंब केला. पोलिस निरीक्षक सुरेंद्र गौड, पोलीस शिपाई संतोष विष्णू लाखे, माधव मारुती झेंडे, गणेश अशोक शिंदे, श्रीकांत मार्केंडय बोनाकृती, गंगाधर केशाव, अशोक अकबर गायकवाड आणि कैलास प्रकाश जाधव असे पोलिस दलातून निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अपर पोलीस महासंचालक (लोहमार्ग) प्रज्ञा परवदे यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह आठ कर्मचार्‍यांना एकाच वेळी निलंबित केल्यामुळे पुणे पोलिस दलात खळबळ माजली

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here