भागवत भंगाळे बिएचआर चौकशीकामी जळगाव पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : जळगाव येथील हॉटेल, मद्य आणि सुवर्ण क्षेत्रातील व्यावसायीक भागवत भंगाळे यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिएचआर फसवणूक प्रकरणी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. त्यांना जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनला बसवण्यात आले आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास भागवत भंगाळे हे मॉर्निग वॉक करत असतांनाच त्यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

यासह पाळधी, भुसावळ, जामनेर याठिकाणी देखील पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्य पथकाने छापेमारी करत संबंधीतांना ताब्यात घेतले आहे. भुसावळचे माजी उप नगराध्यक्ष देखील पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. जामनेरचे पंचायत समितीचे माजी सभापती छगन झाल्टे, जामनेर शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, तळेगाव ता. जामनेरचे कपाशी व्यापारी राजेश लोढा यांना देखील पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. पुण्याच्या सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलिसात नोंदवलेल्या फिर्यादीनुसार 25 नोव्हेंबर 2020 रोजी बिएचआर अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह इतर दहा जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here