बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी एकुण बारा ताब्यात

पुणे : बीएचआर गैरव्यवहार व अपहार प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार 17 जून रोजी चौकशीकामी ताब्यात घेतलेल्यांची एकुण संख्या बारा झाली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेले बारा जण जळगाव शहर, जामनेर (जळगाव), पाळधी (जळगाव), भुसावळ जि. जळगाव, औरंगाबाद, धुळे, मुंबई, अकोला, पुणे अशा सहा जिल्ह्यातील आहेत.

आज भल्या पहाटेच मॉर्नींग वॉक साठी घरातून निघालेले जळगावचे व्यावसायीक भागवत भंगाळे यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. भागवत भंगाळे हे जळगाव शहरातील हॉटेल, मद्य आणि सुवर्ण क्षेत्रातील एक बडे प्रस्थ आहेत. ताब्यात घेतलेल्यांची नावे अशी आहेत. भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मनियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा (जळगाव), प्रमोद किसनराव कापसे (अकोला). पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या निर्देशाखाली सदर कारवाई सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here