ठाणे येथील पत्रकार बिनु वर्गीस विरुद्ध खंडणीचा गुन्हा

ठाणे : ठाणे नगर पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल असलेला कथित पत्रकार बिनू वर्गीस याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस स्टेशनला अजून एक खंडणीचा गुन्हा बुधवारी रात्री नव्याने दाखल झाला आहे. ठाणे मनपाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याकडून तीन लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप तक्रारीत नमुद करण्यात आला आहे.

कथित पत्रकार बिनु व त्याची सहकारी महिला पत्रकार नाझीया सय्यद तसेच उपायुक्तांविरुद्ध विनयभांची तक्रार करणारी एक महिला या तिघांनी मिळून ठाण्यातील बाळकूम येथील ठाणे मनपाच्या ग्लोबल रुग्णालयात 15 मे 2021 रोजी हा प्रकार केला. मनपा उपायुक्त केळकर यांच्या तक्रारीनुसार ‘या रुग्णालयातील एका परिचारिकेचा लैंगिक छळ उपायुक्त केळकर यांच्याकडून सुरु असल्याचा मजकूर एका व्हॉटसअ‍ॅप गृपवर प्रसारीत करण्यात आला होता.

त्याच रुग्णालयातील अन्य एका महिला कर्मचा-यासोबत केळकर यांचे फोटो सोशल मिडियावर प्रसारीत करण्यात आले. अन्य महिलांच्या बदनामीची भिती दाखवून उपायुक्तांकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. यापैकी तिन लाख रुपयांची पुर्तता 1 जून 2021 रोजी रुग्णालयात केळकर यांच्या कॅबीनमधे करण्यात आल्याचा आरोप आहे.

पुर्ण पाच लाख रुपये मिळाले नसल्यामुळे त्यावेळी बिनु याने त्यावेळी केळकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. मिळालेल्या तिन लाख रुपयांपैकी एक लाख रुपये उपायुक्तांवर विनयभंगाची तक्रार दाखल करणा-या महिलेस देण्यात आले. तसेच उर्वरीत एक लाख रुपये महिला पत्रकार नाझीया हिस देण्यात आल्याचे बिनु याने म्हटले आहे.

विनयभंगाची तक्रार बनावट स्वरुपाची असून बदनामीचा धाक दाखवत आपल्याकडून तिन लाख रुपये घेतल्याची तक्रार उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी कापूरबावडी पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. कथित पत्रकार बिनु वर्गीस विरोधात एकाच आठवड्यात दुसरा गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here