मामीसोबत का फिरतो? जाब विचारल्याने तरुणास मारहाण

जळगाव : मामीच्या मोटारसायकलवर गल्लीतील इसम डबलसिट बसून जात असल्याचे बघून भाच्याने संबंधितास जाब विचारला असता त्याला मारहाण झाली. या मारहाण प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात एक नोकरदार तरुण राहतो. त्याची मामी देखील त्याच परिसरात आपल्या परिवारासह राहते. मामी रहात असलेल्या घराशेजारी एक इसम राहतो. तो इसम मामीसोबत मोटारसायकलवर जात असल्याचे बघून तरुणाला राग आला. त्यामुळे त्याने पाठलाग करत त्या इसमाला जाब विचारला. जाब विचारणा-या तरुणास सदर इसमाने बेदम मारहाण केली.

12 तारखेच्या रात्री झालेल्या या मारहाणीत सदर तरुणाच्या हाताला जबर दुखापत झाल्याने त्याच्या हातावर टाके पडले आहेत. वैद्यकीय उपचार झाल्यानंतर सदर तरुणाने एमआयडीसी पोलिस स्टेशनला याबाबत रितसर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here