हिरे रुग्णालयाच्या डीन यांच्याकडील चोरीप्रकरणी तिघांना अटक

धुळे : धुळे येथील शासकीय हिरे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीचा तपास लागला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. डीन डॉ. सापळे यांच्या शासकीय निवासस्थानातून सात लाख रुपयांची रोकड व सुमारे 35 तोळे सोने चोरीला गेले होते. मोलकरणीच्या मुलीने या चोरीत मुख्य भुमिका बजावल्याचे दिसून आले आहे.

डीन डॉ. पल्लवी सापळे यांचे निवासस्थान हिरे रुग्णालयाच्या आवारातच आहे. त्यांच्याकडे नंदा विजय लाडे ही मोलकरणी कामाला आहे. तिची मुलगी कविता हिस नवीन घर घ्यायचे होते. तिने पाहिलेल्या घराची किंमत तिच्या बजेटच्या बाहेर होती. त्यामुळे तिने तिची आई कामाला जात असलेल्या डॉ. सापळे यांच्याकडे चोरीचा कट रचला. डॉ. सापळे यांच्या घराच्या चाविची बनावट चावी तिने तयार केली. कविता हिने मयुर चंद्रकांत बागुल याच्या मदतीने हा चोरीचा प्रकार केल्याचे पोलिस चौकशीत व तपासात समोर आले आहे. या घटनेप्रकरणी मोलकरणी नंदा विजय लाडे हिच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.  

दरवाज्याचे कुलूप न तोडता झालेल्या चोरीच्या घटनेमुळे पोलिसांना सुरुवातीपासून मोलकरणीवर संशय होता. तो संशय तपासात व चौकशीत खरा ठरला. सुरुवातीला मोलकरणी असलेल्या नंदा लाडे हिस व नंतर क्रमाक्रमाने तिची मुलगी कविता व नंतर मयुर बागुल अशा तिघांना ताब्यत घेतल्यानंतर सर्व घटनाक्रम उघडकीस आला.  कविता व मयूर या दोघांकडून 10 लाख 65 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here