अग्नीशस्त्राची तस्करी करणारी टोळी ताब्यात ;विस लाखाची 42 पिस्तुले व 66 काडतुसे जप्त

ताब्यातील आरोपी व मुद्देमालासह तपास पथक

पिंपरी : अग्नीशस्त्राची अवैध तस्करी करणा-या तब्बल 26 आरोपींच्या मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील टोळीला ताब्यात घेण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनीट चारच्या पथकाने ही कामगीरी केली आहे. आरोपींकडून 19 लाख 89 हजार 500 रुपयांची 42 पिस्तुल व 66 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी मध्यप्रदेशात वेळोवेळी वेशांतर करून सलग दोन दिवस  मुक्काम करत या टोळीचा प्रमुख असलेला आरोपी मनिसिंग भाटीया यास अटक केली आहे. त्याच्याकडून ११ गावठी पिस्तूल व २२ जिवंत काडतुसे जप्त करण्यत आली.

आरोपी भाटीया आणि त्याचा साथीदार कालुसिंग जसवंतसिंग (सिंघाना, जि. धार, म.प्र.) या दोघांनी आरोपी कुश पवार, प्रसन्न पवार, आकाश वाघमोडे, योगेश कांबळे, गोटु गित्ते यांच्या टोळीला ही अग्निशस्त्रे विक्री केल्याचे उघड झाले. आरोपी कुश पवार, प्रसन्न पवार, प्रकाश मांडेकर, सिराज शेख यांनी मध्यप्रदेशातून पिस्तूल व गावठी कट्टे आणले व ते महाराष्ट्र राज्यात विकली.

या प्रकरणातील २६ आरोपी निष्पन्न झाले. यात काही सराईत गुन्हेगारांना शस्त्रविक्री झाल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपी शिवकुमार मुरगन ऊर्फ बल्ली (देहूरोड) यास होम क्वारंटाईन केले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याला नोटीस देण्यात आली. निदर्शनास आले.

क्वारंटाइन कालावधी आटोपल्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. काही आरोपींवर विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. अजून शस्त्रांचा शोध पोलिसांकडून सुरूच आहे. युनिट चारचे स.पो.नि.अंबरिष देशमुख पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here