बांधकामाचे स्टील चोरी करणारे पाच अटकेत

नाशिक – घर बांधकामासाठी आणलेल्या सळईंच्या बंडलची चोरी करणा-या पाच चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील घर बांधकामाला आणलेल्या स्टील चोरीप्रकरणी पाच संशयीत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

संतोष बाळू गिते यांनी त्यांचे घर बांधण्याकामी लागणारी तीस हजार रुपयाची आठ एमएम गेजची सात स्टील बंडल 13 सप्टेंबर रोजी आणली होती. दुस-याच दिवशी 14 सप्टेबर रोजी ती स्टील बंडल चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत अटक केली.

राजू रतन लंगड (23), कैलास भगीरथ लंगडे (22), शंकर कृष्णा लंगडे (21), ईश्वर विठ्ठल कडू (21), विठ्ठल अशोक लंगडे (19), धूलीचंद ऊर्फ धुळा रामा भगत (40) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस निरीक्षक वसंत पथवे, उपनिरीक्षक राजू दिवटे यांच्यासह हवालदार विजय रुद्रे, सचिन देसले, राज चौधरी, मुकेश महिरे, कल्पना जगताप पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here