तिरोडा पोलिसांच्या कारवाईत गांजा जप्त

गोंदीया (अनमोल पटले) : तिरोडा पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचे रणशिंग फुंकले असून संत रविदास वार्ड तिरोडा येथील एका घरात धाड टाकून 1642 रुपये किंमतीचा 146.840 ग्राम गांजा जप्त केला आहे. 3 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईने गांजा व्यावसायीकांच्या गोटात खळबळ माजली आहे.

3 आक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने अम्रिबी अब्दुल हबीब शेख (68) रा. संत रविदास वार्ड तिरोडा या महिलेकडे धाड टाकली. या धाडीत मोठ्या प्लास्टीक थैलीसह सात लहान पुड्यांमध्ये 146.840 ग्राम गांजा (किमंत 1642.60) मिळून आला. या प्रकरणी तिरोडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो.नि. योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते, हवालदार कवलसिंग भाटिया, शिपाई शैलैश दमाहे, विदेश अंबुले, विजय बिसेन, महिला शिपाई नीता सपाटे, चालक अक्तर शेख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here