हत्याकांड प्रकरणी पोवार महासभेचे धरणे

गोंदीया (अनमोल पटेल) : तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील बिसेन परिवारातील तिन सदस्यांची हत्या व एकाला फासावर लटकवण्यात आले होते. या हत्याकांडाच्या घटनेला तेरा दिवस लोटले आहेत. अद्याप मारेक-यांचा तपास लागलेला नाही.

मारेकऱ्यांचा शोध व गुन्ह्याचा तपास जलदगतीने लावण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय पोवार महासभेच्या वतीने तिरोडा पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता. चंद्रभागा नाक्यापासुन काढण्यात आलेल्या या मोर्चाने जनतेचे लक्ष वेधले होते. सुमारे दोन ते तिन तास चाललेल्या या आंदोलनाची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी आंदोलकांची समजूत घालत तपास लवकरात लवकर लावण्याचे आश्वासन दिले. पोलिस अधिका-यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाचा समारोप करण्यात आला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here