लुटीत सहभाग घेणारा पोलिस कर्मचारी बडतर्फ

अकोला : लक्झरी बसमधील प्रवाशाला बसमधे जावून मारहाण करत त्याच्या ताब्यातील पन्नास लाख रुपये घेवून पोबारा केल्याची घटना अकोला नजीक रिधोरा गावाजवळ घडली होती. 30 सप्टेबर रोजी घडलेल्या घटनेतील चौघा जणांमधे पोलिस कर्मचा-याचा सहभाग आढळून आला. रामविलास उर्फ राम गोविंद पवार असे पोलिस कर्मचा-याचे नाव असून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी त्यास सेवेतून बडतर्फ केले आहे.

पोलिस असल्याचे सांगत अकोला – मुंबई या लक्झरी बसमधे घुसून प्रवाशाला मारहाण करत त्याच्याकडील पन्नास लाख रुपये घेवून चौघे जण पळून गेले होते. या प्रकरणी तपासात पोलिस कर्मचारी रामविलास उर्फ राम गोविंद पवार याच्यासह यशपाल मदनलाल जाधव, तनवीर खॉ उर्फ सोनू जहांगिर, अमित उर्फ पिंकू प्रेमशंकर मिश्रा अशा सर्वांना अटक करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अटकेतील चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यात सहभागी असलेला पोलिस कर्मचारी रामविलास उर्फ राम गोविंद पवार यास पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी बडतर्फ केले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here