अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल – नाशिकच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

अमरावती : विषाची बाटली दाखवत चाकूच्या धाकावर करण्यात आलेल्या विवाहितेच्या लैंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल केल्याची संतापजनक घटना तळेगाव दशासर पोलिस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पोटींदे (28) रा. निफाड – नाशिक असे संशयीत तरुणाचे नाव आहे.

सचिन पोटींदे हा पीडित महिलेला मोबाइलवर वारंवार कॉल करुन शरीरसुखाची मागणी करत होता. महिलेकडून नकार मिळाल्यानंतर त्याने तिला टॉयलेट क्लिनर प्राशन केल्याचा व्हिडीओ पाठवला. घाबरलेल्या महिलेकडे त्याने वेळोवेळी विषाची बाटली व चाकूच्या धाकावर बळजबरी संबंध प्रस्थापित केले.

या प्रकाराचा करण्यात आलेला व्हीडीओ त्याने तिला दाखवत वेळोवेळी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर देखील त्याने तो व्हीडीओ तिच्या नातेवाईकांना पाठवत तिची समाजात बदनामी केली. या घटनेप्रकरणी तळेगाव दशासर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here