क्रिकेटवर ऑनलाईन जुगार खेळणारे अटकेत

गोंदीया (अनमोल पटले) : क्रिकेट या खेळावर ऑनलाईन जुगार खेळणा-या पाच जणांवर तिरोडा उप विभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव यांच्या पथकाने छापा घालत कारवाई केली आहे.

सहा ऑक्टोबरच्या रात्री शहरातील ड्रीम गार्डन लॅंड व त्रिमुर्ती पान पॅलेस परिसरात सदर कारवाई करण्यात आली. या कारवाईत डिवायएसपी नितीन यादव यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात सुजल विजय सुधारानी, केशव राजकुमार धामेचा, आयुष सोमेन्द्र उपवंशी, भूषण वेणुधर सूर्यवंशी व एका विधीसंघर्षीत बालकास (सर्व रा. चुरडी फाटा तिरोडा) ताब्यात घेण्यात आले आहे.

हैद्राबाद – बंगलोर या चमू दरम्यान सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट खेळावर हे सर्वजण मोबाईलवर ऑनलाईन जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध रितसर कारवाई करण्यात आली आहे. हवालदार भाटीया, कर्मचारी दमाहे, बिसेन व मोहित आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here