ग्रामसभांना पोलीस प्रोटेक्शन द्या – सरपंच संघटनेची मागणी

गोंदीया (अनमोल पटले) : तिरोडा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने पंचायत समिती व विद्युत अभियंता यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही तर सरपंच संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतांना तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष नितेश खोब्रागडे, उपाध्यक्ष राजेश पेशने, सरचिटणीस राजेंद्र चामट, वडेगावच्या सरपंच तुमेश्वरी बघेले, सातोनाच्या सरपंच लक्ष्मी ठाकरे, पिंडकेपारच्या सरपंच भारती झगेकार, डोंगरगावच्या सरपंच झनेश्वरी वासनिक, खमारीच्या सरपंच सविता पटले, कवलेवाडाचे सरपंच किरणकुमार पारधी, चिखलीच्या सरपंच छाया रंगारी, लाखेगावच्या सरपंच चित्ररेखा चौधरी, नवरगावचे प्रकाश ठाकरे, हस्तराज पारधी, मुंडीपारचे वासुदेव हरिणखेडे, अर्जुनीचे समिककुमार बंसोड, पालडोंगरीचे चंद्रकुमार चौधरी, पुजारीटोलाचे अनिल मरस्कोल्हे, मरारटोलाचे गुलाब कटरे, मुंडीकोटाचे कमलेश आथिलकर, धादरीचे अजितकुमार ठवरे, मारेगावच्या प्रतिमा उइके, भजेपारच्या वर्षा पंधरे, करटी खुर्दच्या वर्षा मालाधारे, इंदोरा बु.च्या प्रभा अंबुले, घोगराच्या प्रीती भांडारकर, मनोराचे राजेश पेशाने व निमगावचे रिता पटले उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here