नगरसेवकावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा

गोंदीया : येथील नगरसेवक सचिन गोविंद शेंडे व त्यांच्या मित्रांचा रस्ता अडवून खून करण्याचा प्रयत्न करणा-या दोघा जणांविरुद्ध रामनगर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंसत नगर परिसरातील हॉटेल केसरसमोर 4 ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नगरसेवक सचिन शेंडे हे आपल्या चौघा मित्रांसह एका अंत्ययात्रेत जात होते. त्यावेळी रस्त्यात डॅनी खरे व शाहरुख पठाण या दोघांनी त्यांची वाट अडवली होती. सचिन शेंडे व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत लोखंडी फरशाने हल्ला करत खून करण्याचा प्रयत्न यावेळी दोघांकडून करण्यात आला.

तसेच त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलचे देखील नुकसान करण्यात आले. या घटनेप्रकरणी रामनगर पोलिस स्टेशनला भा.द.वि. 307, 341, 323, 427, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here