एम्को कंपनीत इलेक्ट्रीक साहित्य चोरीप्रकरणी गुन्हा

जळगाव : उमाळा गावानजीक एम्को प्रायव्हेट लिमीटेड (सिद्दार्थ इंडस्ट्रीज) या कंपनीतील इलेक्ट्रीक मोटर्स व इतर साहित्य चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एम्को प्रायव्हेट लिमीटेड (सिद्धार्थ इंडस्ट्रीज) या कंपनीचा ताबा एनसीएलटी न्यायालयाकडून लिक्विडेटर म्हणून सुन्द्रेश भट यांच्याकडे आला आहे. पब्लिक सिक्युरिटी अ‍ॅंण्ड प्लेसमेंट या फर्मला या कंपनीच्या सिक्युरिटीचे कंत्राट देण्यात आले आहे. या सिक्युरिटी फर्ममधे काम करणा-या सिक्युरिटी गार्ड व सुपरवायझर अशा सर्वांनी मिळून त्याच्या कब्जातील मालमत्तेची संगनमताने चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. इलेक्ट्रीक मोटारी व अ‍ॅल्युमिनीयम व्हिल असा एकुण 73 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अनिलकुमार श्रीमुंशीराम वर्मा (जिल्हा भिवानी हरयाणा) यांनी दिलेल्य फिर्यादीनुसार राजकुमार चंद्रभान पटेल, अशोक चंद्रभान पटेल (दोघे रा. जिल्हा देवरीया बेलवा उत्तर प्रदेश), प्रिमतकुमार सदानंद मौर्य (देवरीया उत्तर प्रदेश), शशीकांत सतीराम (उत्तर प्रदेश), सुग्रीव कुमार रामप्रसाद (मैनी पोस्ट खंबा रुधौनी खुर्द उत्तर प्रदेश), तारकेश्वर स्वामीनारायण पटेल (देवरीया उत्तर प्रदेश), रजनीश त्रिभुवन पटेल (चंद्रभागा चाळ कोपरखैराणे ठाणे), धरमेंदर दोलीचंद सैनी (ओल मथुरा उत्तर प्रदेश) अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 677/21 भा.द.वि. 381, 34 नुसार दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि. प्रमोद कठोरे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here