स.पो.नि. सुनिल लोखंडे पाच दिवस पोलिस कोठडीत

अहमदनगर : पिस्तुलचा धाक दाखवत महिलेसह तिच्या दोन्ही लहान मुलांना ओलीस ठेवणा-या स.पो.नि. सुनिल लक्ष्मण लोखंडे यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या डीवायएसपी संदीप मिटके यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. लोखंडे यांनी केलेल्या जिवघेण्या हल्ल्यातून डीवायएसपी मिटके सुदैवाने बचावले आहेत.

स.पो.नि. सुनिल लोखंडे यांना खात्यातून निलंबीत करण्यात आले आहे. राहुरी न्यायालयाने लोखंडे यांना 13 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महिलेच्या मुलीच्या फिर्यादीनुसार दुसरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डीवायएसपी मिटके यांच्या फिर्यादीनुसार नोंद झालेल्या गुन्ह्याचा तपास संगमनेरचे डिवायएसपी राहुल मदने करत आहेत. साक्षी नान्नोर या मुलीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पो.नि. राजेंद्र इंगळे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here