काकाचा खून करणारा संशयीत पुतण्या अटकेत

जळगाव : जळगाव शहराच्या आंबेडकर नगर भागातील काकाचा खून करुन फरार झालेल्या संशयीत पुतण्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राजु पंडीत सोनवणे असे हत्या झालेल्या काकाचे तर सुरज उर्फ विशाल अनिल सोनवणे (33) रा. आंबेडकर नगर जुने जळगाव असे अटकेतील संशयीत आरोपी असलेल्या पुतण्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न. 200/21 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटकेतील संशयीत सुरज हा कोणताही कामधंदा करत नव्हता तसेच तो नेहमी व्यसन करत होता. त्यामुळे त्याचे काका त्याला नेहमी बोलत होते. वेळप्रसंगी ते त्याला मारहाण देखील करत होते. त्यामुळे सुरजच्या मनात काका राजु सोनवणे यांच्याबद्दल राग होता. त्या रागातून संधी साधत ते रात्रीच्या वेळी झोपेत असतांना सुरजने त्यांची हत्या केल्याचे कबुल केले आहे.

घटना घडल्यापासून सुरज फरार झाला होता. त्याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी पथक तयार केले होते. त्या पथकात पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील यांचा समावेश करण्यात आला होता. पथकातील सर्व सहका-यांनी फरार सुरजचा विविध मार्गांनी माग काढला. मुंबई, नवी मुंबई, नाशिक, जळगाव व भुसावळ इत्यादी ठिकाणी फरार सुरजचा मागोवा घेण्यात आला. मात्र तो हाती लागत नव्हता.

फरार सुरज हा जळगाव शहराच्या भोईटे नगर भागातील रेल्वे मालधक्का परिसरात आला असल्याची माहिती पथकाला समजली. सापळा रचून त्याला शिताफीने अटक करण्यात आली. सुरुवातीला आपली ओळख लपवणा-या सुरजने नंतर आपली ओळख उघड करत आपला गुन्हा देखील कबुल केला. त्याला अटक करण्यात आली. त्याचे काका राजु सोनवणे त्याला मारहाण करत त्रास देत होते. त्यामुळे त्याच्या मनात काकाविषयी राग निर्माण झाला होता. त्या रागातून त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. पुढील तपासकामी त्याल शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here