गोंदिया जिल्ह्यात 100 टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट – जिल्हाधिकारी गुंडे

गोंदिया ( अनमोल पटले) : विशेष कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्यात “मिशन कवच कुंडल मोहिम” राबवण्यात येत आहे. सदर मोहीम दिनांक 8 ते 14 ऑक्टोंबर 2021 दरम्यान प्रभावीपणे राबवली जात असून शंभर टक्के लसीकरण हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन कापसे उपस्थित होते.

सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर टास्क फोर्स गठित करण्यात आले असून दररोज सायकांळी पाच वाजेच्या सुमारास तहसिलदार यांच्या कक्षात तालुका स्तरावर गटविकास अधिकारी, नगर पंचायत मुख्याधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची तर एसडीओ कार्यालयात तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी दररोजचा आढावा घेणार आहेत.

गोंदीया जिल्ह्यात आतापर्यंत 77 टक्के लसीकरण पहिल्या डोसचे करण्यात आले असून उर्वरित डोस आँक्टोंबर शेवटपर्यंत करण्यासाठी सहा दिवस इतर सर्व कामे सोडून ही मोहीम राबवली जाणार आहे. गाव निहाय कुटूंबाचे सर्वेक्षण करुन कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला व दुसरा डोस घेण्यास पात्र लाभार्थ्यांना गाव पातळीवर लसीकरण सत्र आयोजित केले जाईल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here