विवाहितेच्या सतर्कतेने चोरटा तावडीत

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : चांदीच्या पाटल्या पॉलीश करुन देतो असे म्हणत हातसफाई करणारी टोळी जळगाव शहरात दाखल झाली असून जनतेने सावध राहण्याची वेळ आली आहे. मात्र एका विवाहीतेच्या हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने होणारी चोरी टळली व अल्पवयीन चोरटा पळून जात असतांना लोकांच्या तावडीत सापडला.

एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या एका मजुराची पत्नी घरी असतांना एक अल्पवयीन मुलगा तिच्याकडे आला. तुमच्या हातातील चांदीच्या पाटल्या पॉलीश करुन देतो असे तो त्या विवाहीतेला म्हणाला. पॉलीश करण्यासाठी तिने हातातील पाटल्या काढून त्या मुलाच्या हातात दिल्या. मात्र त्याच वेळी विवाहीतेच्या तिक्ष्ण नजरेने त्या मुलाच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. हातातील पाटल्या तो मुलगा घेत असतांना त्या विवाहितेने जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

महिलेचा आवाज ऐकून तो बालक पळू लागला मात्र इतर लोकांच्या तावडीत सापडला. अवघा सतरा वर्ष वय असलेल्या मुलाला परिसरातील लोकांनी पकडून ठेवत पोलिसांना बोलावले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश अहिरे, शांताराम पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत त्या मुलाला ताब्यात घेतले.

बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातून आलेल्या त्या अल्पवयीन मुलाची चोरी करण्याची हिम्मत बघता जळगाव शहरात अशी टोळी आली असल्याचे म्हटले जात आहे. त्या मुलाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. नागरिकांनी अशा घटनांपासून सावध रहावे आणी अशी घटना समजल्यास पोलिस स्टेशनला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here