बँक व्यवस्थापकाने घातला 13 लाखाचा गंडा!– ग्राहकांना फसवण्याचा शोधला अजब फंडा!!

नाशिक : बॅंकेत ठेव ठेवणा-या ग्राहक ठेवीदारांना चुकीचे मार्गदर्शन करत बँक व्यवस्थापकाने 13 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. अमित दिलीप कुलकर्णी असे सदर बॅंक मॅनेजरचे नाव असून तो नाशिकच्या अमृतधाम येथील अ‍ॅक्सीस बॅंकेत मॅनेजर पदावर कार्यरत आहे. ठेवीदार ग्राहकासह नोकरी करत असलेल्या बॅंक व्यवस्थापनाची देखील अमित कुलकर्णी याने फसवणूक व नुकसान केले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र जाधव (मेडीकल फाटा आडगाव) यांनी अ‍ॅक्सीस बॅंकेत 13 लाख 80 हजार रुपयांची ठेव ठेवली होती. बॅंक मॅनेजर पदावर असलेल्या अमित कुलकर्णी याने जाधव दाम्पत्याच्या खात्याची माहिती काढली. त्यांनी जाधव दाम्पत्याची दिशाभुल करत त्यांना सांगितले की तुम्ही आमच्या बॅंकेत ठेवलेल्या रकमेवर जास्त व्याज मिळणार नाही. त्यापेक्षा तुम्ही दुस-या बॅंकेत तुमची रक्कम गुंतवा. मी तुम्हाला जास्त रकमेचे व्याज मिळवून देतो.

अधिक व्याजाच्या लोभात व मॅनेजर कुलकर्णी यांच्या गोड बोलण्याला जाधव दाम्पत्य बळी पडले. मॅनेजर कुलकर्णी यांनी को-या चेकवर सह्या घेत आपली आर्थिक फसवणूक केल्याचे जाधव दाम्पत्याच्या नंतर लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी पंचवटी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here