वृद्धाची सोन्याची अंगठी घेत तिघांचे पलायन

जळगाव : भाजीपाला घेतल्यानंतर घरी परत जात असतांना तिघांनी मिळून वृद्धाच्या बोटातील सोन्याची मौल्यवान अंगठी बळजबरी काढून घेत पलयान केले आहे. दिवसाढवळ्या वृद्ध व्यक्तींना हेरुन लुटमारीचा प्रकार या घटनेच्या माध्यमातून उघड झाला आहे.

कांतीलाल मिश्रीलाल जैन हे 71 वर्षाचे वयोवृद्ध जेष्ठ नागरीक पंचमुखी हनुमान मंदीराजवळ असलेल्या रणछोड नगर भागात राहतात. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते भाजीपाला घेण्यासाठी सिंधी कॉलनी येथे गेले होते. बाजार केल्यानंतर ते रिक्षाने परत आले व पद्मावती मंगल कार्यालयाजवळ उतरले. त्यावेळी त्यांच्या हातातील अंगठीवर तिघांनी पाळत ठेवली होती.

अकरा वाजेच्या सुमारास कांतीलाल जैन हे पद्मावती मंगल कार्यालयापासून घराच्या दिशेने पायी जात होते. त्याचवेळी एक जण त्यांच्या मागे पळत आला. त्या अज्ञात इसमाने त्यांना हात धरुन थांबवले. त्याचवेळी नियोजन केल्यानुसार त्याचे दोघे साथीदार मोटार सायकलवर आले. आलेल्या दोघांनी वृद्ध कांतीलाल जैन यांना धरुन ठेवले. अगोदर आलेल्या इसमाने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरी काढून घेतली. परिसरात कुणीच नसल्याचा गैरफायदा घेत तिघांनी लागलीच पलायन केले.

कांतीलाल जैन यांनी आरडाओरड केली. मात्र त्यावेळी परिसर निर्मनुष्य असल्यामुळे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. 8 ग्रॅम वजनाची 24 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हातातून गेल्याने कांतीलाल जैन हतबल झाले होते. त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत सर्व हकीकत कथन केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here