जळगावच्या नागरिकांनी कार्यालयीन वेळेतच आजारी पडावे

Jalgaon civil hospital

जळगाव : अत्यावश्यक सेवेत रुग्णालय हा एक महत्वाचा घटक म्हटला जातो. रुग्णालय आणि रुग्णालय प्रशासन रुग्ण जनतेच्या सेवेसाठी 24 तास सज्ज असतात. सरकारी दवाखान्याच्या बाबतीत तर हा नियम अगदी काटेकोरपणे पाळला जातो. मात्र जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाबतीत हा नियम नसल्याचे एका घटनेतून दिसून आले. कुणाला आजारी पडायचे असल्यास कार्यालयीन वेळेत दिवसा आजारी पडावे तसेच रुग्णालयाशी संबंधीत कितीही अत्यावश्यक काम असले तरी ते कार्यालयीन वेळेतच जनतेने पुर्ण करावे असे म्हणण्याची वेळ आली आहे.

जळगाव शहरात एका रुग्णाला 9 ऑक्टोबर रोजी तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज होती. त्या रुग्णाने बराच वेळ भटकंती केल्यानंतर सामाजीक कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांची भेट घेत आपली व्यथा कथन केली. सामाजिक कार्यकर्ता गुप्ता यांनी याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन मिलींद फुलपाटील यांना रात्रीच्या वेळी फोन केला. मात्र डीन असलेल्या फुलपाटील यांनी गुप्ता यांना एक चमत्कारी उत्तर दिले.

डीन मिलींद फुलपाटील यांनी गुप्ता यांना उत्तर दिले की मला केवळ कार्यालयीन वेळेत दिवसा फोन करावा. त्यावर दिपक कुमार गुप्ता यांनी त्यांना म्हटले की आपण एक डीन आहात आणी अत्यावश्यक कामासाठीच आपणास फोन करण्यात आला आहे. त्यावर पलिकडून फुलपाटील यांनी गुप्ता यांना म्हटले की मी डीन असलो म्हणून काय झाले? मला केवळ दिवसाच फोन करावा. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनी डीन पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण केवळ बेसीक सॅलरी घ्यावी तसेच इतर भत्ते शासकीय तिजोरीत जमा करावे. या पत्राची प्रत त्यांनी जिल्हाधिकरी जळगाव यांना दिली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here