बनावट चलनी नोटा येणार होत्या अर्थ व्यवहारात- महिला डॉक्टरसह पाच जण कोठडीच्या अंधारात

नाशिक : दिड लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा व्यवहारात येण्यापुर्वीच महिला डॉक्टरसह पाच जणांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. लासलगावचे स.पो.नि. राहुल वाघ व त्यांच्या सहका-यांनी दिड लाख रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतलेल्या पाच जणांमधे एका महिला डॉक्टरचा सहभाग असल्याने खळबळ उडाली आहे. मोहन बाबूराव पाटील, डॉ. प्रतिभा बाबूराव घायाळ, विठ्ठल चंपालाल नाबरिया (सर्व रा. लासलगाव) तसेच रवींद्र हिरामण राऊत (रा. पेठ), विनोद मोहनभाई पटेल (रा. पंचवटी) अशी अटकेतील पाच जणांची नावे आहेत.

मोहन पाटील, डॉ. प्रतिभा घायाळ, विठ्ठल नाबरिया या तिघांना बनावट नोटा देण्यासाठी रविंद्र राऊत व विनोद पाटील हे बनावट नोटा देण्यासाठी येवला रस्त्यावरील विंचुर या ठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती लासलगावहे स.पो.नि. राहुल वाघ यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा लावण्यात आला. 13 ऑक्टोबर रोजी पाचही जण एकत्र आल्यानंतर त्यांच्यात व्यवहार होत असतांना पोलिस पथकाने त्यांच्यावर छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत 1 लाख 45 हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह त्यांच्या ताब्यातील कार असा अंदाजे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हे.कॉ. प्रदीप आजगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लासलगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here