गावठी पिस्टलसह रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक

जळगाव : अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्टल बाळगत परिसरात दहशत माजवणा-या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. युनुस सलीम पटेल उर्फ सद्दाम रा. गेंदालाल मिल असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने युनुस यास गेंदालाल मिल भागातून शिताफीने अटक केली असून त्याला पुढील तपासकामी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या युनुसने काही महिन्यापुर्वी हळदीच्या एका कार्यक्रमात पिस्टल सोबत व्हिडीओ व्हायरल केल्याचे समजते. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. जळगाव तालुका पोलिस स्टेशनला देखील त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

अटकेतील युनुस हा धावत्या रेल्वेत चहा विक्रीचा व्यवसाय करतो. चहा विक्री करत असतांना समव्यवसायी चहा विक्रेत्यांसोबत त्याचे वाद झाले होते. सदर वाद विकोपाला गेल्यामुळे आपल्या जिवाला धोका असल्याचे त्याला कुणाकडून तरी समजले. त्या माहितीच्या आधारे आपला जिव वाचवण्याकामी त्याने उमर्टी येथून गावठी कट्टा आणल्याचे म्हटले जात आहे. गेंदालाल मिल परिसरातील अ‍ॅक्सीस बॅंकेजवळ पान टपरीच्या आडोशाला उभा असतांना पोलिस पथकाने त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे.

पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रीतमकुमार पाटील, राहुल पाटील, राहुल बैसाणे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here