जुन्या वादातून तरुणास मारहाण – गुन्हा दाखल

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : दोन वर्षापुर्वी झालेल्या वादातून चौघा जणांनी तरुणास चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना कासमवाडी भागात रात्री साडेबारा वाजेच्या वेळी घडली. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत गोपाल चौधरी या तरुणाचा दोन वर्षापुर्वी अमन चंद्रकांत सोनवणे याच्यासोबत वाद झाला होता. तो वाद त्यावेळी आपसात मिटवण्यात आला होता. मात्र त्यानंतर देखील अमन सोनवणे याचे साथीदार सुनिल राठोड, अनिल राठोड, रोहित भालेराव असे सर्वजण प्रशांतबद्दल मनात राग धरुन बसले होते. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास प्रशांत यास एका मोबाईल क्रमांकावरुन कॉल करुन कासमवाडी भागात बोलावण्यात आले. त्यावेळी प्रशांत व त्याचा मित्र मयुर मराठे असे दोघे जण कासमवाडी – शंकर नगर भागात गेले. त्यावेळी तेथे हजर असलेल्या सुनील राठोड, अनिल राठोड, अमन चंद्रकांत सोनवणे, रोहीत भालेराव (सर्व रा. कासमवाडी जळगाव) यांनी जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी प्रशांत यास चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

सुनिल राठोड याने चाकूने प्रशांतच्या हाताच्या बोटावर मारले. रोहीत भालेराव याने लाकडी दांडक्याने प्रशांतला डोक्यावर आणि गालावर मारहाण सुरु केली. अमन सोनवणे याने दगडाने प्रशांतच्या डोक्यावर मारले. दरम्यान अनिल राठोड याने मारहाणी दरम्यान तुझे वडील चिकन फ्रायची गाडी कशी काय लावतो, ती दुकान उद्या तोडून टाकतो असे म्हणत जिवे ठार करण्याची धमकी दिली. हा वाद सोडवणार प्रशांतचा मित्र मयुर मराठे याला देखील मारहाण करण्यात आली. रुग्णालयात वैद्यकीय उपचारार्थ दाखल असलेल्या प्रशांत चौधरी याने चौघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हे.कॉ. सुनिल सोनार करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here