दांडीया दरम्यान मारहाण व चाकूहल्ला प्रकरणी गुन्हा

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : दांडीया सुरु असतांना धक्का मारल्याने बघून चालण्यास सांगितल्याचा राग आलेल्या दोघांनी तरुणाला मारहाण व चाकू हल्ला केल्याची घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. सम्राट कॉलनीत घडलेल्या या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखील दिलीप गायकवाड (रा. दिक्षीत वाडी जळगाव) हा तरुण सम्राट कॉलनीत परिसरात दांडीया बघण्यास गेला होता. दांडीया बघत असतांना त्याच्याजवळ उदय राठोड व अवी राठोड असे दोघे तरुण आले. उदय राठोड याने निखील यास धक्का मारला. धक्का लागल्याने निखीलने उदय यास बघून चल असे म्हटले. निखीलच्या बोलण्याचा उदयला राग आला. त्याने निखील यास शिवीगाळ केली. आपल्याला शिवीगाळ झाल्याचे बघून निखीलने उदयला चापट मारली.

हा वाद वाढत गेल्याने उदय राठोड याने पळत जावून आणलेल्या चाकूने निखीलच्या कमरेवर हल्ला केला. दरम्यान अवी राठोड याने निखील यास चापटाबुक्क्याने मारहाण करत जिवे ठार करण्याची धमकी दिली. या मारहाणीत जखमी झालेल्या निखील यास दांडीया खेळण्यास व बघण्यास आलेल्या लोकांनी सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला नंतर साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर निखीलने दिलेल्या जवाबानुसार दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. सुनिल सोनार करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here