हत्येनंतर बोरवेलमध्ये लपवला मृतदेह

काल्पनिक छायाचित्र

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील राणीपूर येथे भावाने भावाची हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. हत्यनंतर मृतदेह प्रतापपुर शिवारातील एका बोअरवेलमधे लपवून ठेवण्यात आला. तिन तास प्रयत्न केल्यानंतर जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.

बैल विकण्याच्या वादातून सारपा कर्मा पाडवी या संशयीत आरोपीने त्याचा भाऊ बामन्या पाडवी याची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने तो मृतदेह बोअरवेलमधे लपवला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खूनाची कबुली देत मृतदेह बोअरवेलमधे लपवल्याचे कथन केले. तळोदा पोलिस स्टेशनचे पो.नि. केलसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here