मालाने भरलेले वाहन चोरट्यांनी केले लंपास

जळगाव : जळगाव शहरातील इदगाह कॉम्प्लेक्स येथे पार्क केलेले टाटा 407 हे मालाने भरलेले वाहन चोरट्यांनी चोरुन नेले आहे. या प्रकरणी वाहन मालक दिपक पंडीत हळदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक हळदे यांच्या मालकीच्या टाटा 407 या वाहनावर सरफराज उर्फ गुड्डू तडवी हा चालक आहे. त्याने त्याच्या ताब्यातील वाहन नेहमीप्रमाणे शहरातील इदगाह कॉम्प्लेक्स येथे 16 ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास लावले होते. तत्पुर्वी फैजपूर, सावदा व रावेर परिसरातील व्यावसायिकांच्या मालाची उचल करुन तो माल या वाहनात जमा केला होता. त्यात रेडीमेड कपडे, प्लायवुड, ऑटो पार्टस, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खुर्ची अशा विविध वस्तूंचा समावेश होता. हा सर्व माल ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आला होता. सदर मालाची डीलेव्हरी दुस-या दिवशी रावेर परिसरातील व्यावसायिकांना करायची होती. इदगाह कॉम्प्लेक्स या ठिकाणी वाहन लॉक करुन चालक गुड्डू तडवी घरी निघून गेला होता.

17 ऑक्टोबरच्या सकाळी चालक गुड्डू तडवी यास वाहन जागेवर दिसले नाही. वाहनाचा सर्वत्र शोध घेऊन देखील वाहनाचा कुठेही तपास लागला नाही. व्यावसायीकांना त्यांच्या मालाची डीलीव्हरी देण्यासाठी भरलेल्या मालासह टाटा 407 वाहन चोरीला गेल्याची खात्री झाल्याने वाहन मालक दिपक हळदे यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here