विकासकामांवर भर देण्यास बांधील – आ. विनोद अग्रवाल

गोंदीया(अनमोल पटले) : आ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेच्या काटी क्षेत्रातील बघोली येथील विकासकामांसाठी 29 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. मंजुर निधीचा प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासह विविध विकासकामांसाठी केला जाणार असल्याचे प्रतिपादन आ. अग्रवाल यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या काटी क्षेत्राच्या अंतर्गत आयोजीत भुमीपुजन व लोकार्पन सोहळा आयोजीत करण्यात आला होता. त्याप्रसंगी आ. अग्रवाल बोलत होते.

पुढे बोलतांना आ. अग्रवाल यांनी म्हटले की विकास कामाअंतर्गत चांगले रस्ते, कचरा गाडी, सामाजीक सभागृह आदी विकासकामांसाठी देखील या निधीचा विनीयोग केला जाणार आहे. जनतेने आपल्याला निवडून दिल्याच्या बळावर आपण विकासकामे करण्यास बांधीला आहोत.

शेतकऱ्यांच्या समस्या निराकरण करण्यासाठी प्रत्येक गावात गोदामांची निर्मीती केली जाणार आहे. या गोदामांच्या माध्यमातून शेतक-यांना त्यांचे धान्य विक्रीच्या समस्येतून सुटका होईल. हा उपक्रम प्रथमच साकारला जाणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here