जागतिक हातधुवा दिवस उत्साहात

गोंदीया (अनमोल पटले) : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सेजगाव ता. तिरोडा येथे अदानी फाउंडेशन तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने हात धुवा जागतीक दिवस उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कंठीलालजी पारधी, प्रमुख पाहुणे म्हणून अदानी फाऊंडेशनचे नितीन शिरवाळकर, माजी उप सभापती पंचायत समिती तिरोडा डॉ. किशोर पारधी, उप सरपंच स्वप्नील महाजन, एसएमसी एसडी पारधी, सेजगाव ग्रामपंचायत सचिव तुरकर, राहुल सेजव, स्वप्नील व मुख्याध्यापक एस एन पटले सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस एन पटले यांनी केले.

मनोगत व्यक्त करणा-या व चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना अदानी फाऊंडेशनच्या वतीने बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद उके व आभार प्रदर्शन राहुल सेजव अदानी फाउंडेशन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज रहांगडाले, प्रकाश भालेराव, आर आर बिसेन, एस सी रहांगडाले व पी बी पटले तसेच व्यवस्थापन समितीने सहकार्य केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here