महिला डॉक्टरचे विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी

नाशिक : ओळखीचा गैरफायदा घेत एकाने महिला डॉक्टरचे नको त्या अवस्थेत फोटो काढले. ते फोटो पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात संशयीत राजेश कपीलदेव सिंग (अश्विननगर – नाशिक) याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिडीत महिला डॉक्टरचे संशयित राजेश सिंग याच्यासोबत चांगले संबंध होते. त्याचे महिला डॉक्टरकडे नेहमी येणे जाणे होते. त्यातून त्यांच्यात सहवास वाढला व नंतर प्रेम निर्माण झाले. या संधीचा फायदा घेत राजेश सिंग याने महिला डॉक्टरचे नको त्या अवस्थेत फोटो काढले.

कालांतराने तो तिला भेटण्याचा सारखा तगादा लावत असल्यामुळे तिने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या राजेशने तिचे फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी सायबर पोलिसात पिडीत महिला डॉक्टरने राजेश सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here