गोंदीयाला येणारा तांदळाचा ट्रक यावल पोलिसांच्या ताब्यात

गोंदीया (अनमोल पटले) : धुळे जिल्ह्यातील कापडणे येथून निघालेला व तांदळाने भरलेला ट्रक (एमएच 18 एसी 847) जळगाव जिल्ह्यातील यावल पोलिसांनी पकडला आहे. सदर ट्रक अमळनेर- चोपडा व यावलमार्गे गोंदीयाच्या दिशेने जाणार होता. या ट्रकमधे 30 टन तांदुळ भरलेले आहेत.

यावल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली. पो.नि. सुधीर पाटील यांच्यासह सहायक फौजदार मुजफ्फर खान, पोलिस कर्मचारी सुशील घुगे व चालक गणेश रोहील यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

या ट्रकमधील तांदळाचा साठा संशयास्पद असल्याचे म्हटले जात आहे. दोन दिवसांपासून हा ट्रक यावल पोलिसांच्या ताब्यात आहे. महसुल विभागाच्या अधिका-यांना याप्रकरणी पत्र देऊन सदर तांदुळ रेशनचा आहे काय याबाबत चौकशी  व पडताळणी करण्यासाठी तहसीलदार व पुरवठा विभागाच्या अधिका-यांना कळवले आहे. या मालाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. चालकाच्या म्हणण्यानुसार सदर तांदुळ साठा चोपडा येथील हिरा ट्रान्सपोर्ट यांच्याकडून रवाना झाला आहे. गोंदीया जिल्ह्यात एवढा तांदुळ कुणाकडे जातो हा प्रश्न या निमीत्ताने चर्चीला जात आहे. ट्रक ड्रायव्हरकडे बनावट बिल्टी असल्याचे देखिल म्हटले जात आहे.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here