पाचोरा तालुक्यातील शेतक-यांचे प्रश्न मार्गी लागणार – वडेट्टीवार

जळगाव : पाचोरा तालुक्यात अवकाळी पावसामुळे सुमारे 51 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे अनुदान दिवाळीपुर्वी शेतकरी बांधवांना मिळणार आहे. शहर व ग्रामीण भागातील नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहे. पाचोरा कॉंग्रेसने वेळोवेळी याप्रकरणी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. मंत्र्यांनी पंचनामे करण्यास होकार दिला आहे.

बुरहानपुर येथील प्रचार सभेच्या निमित्ताने आपत्ति व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार जळगाव भेटीवर आले होते. त्यावेळी पाचोरा कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अमजद पठाण, अल्पसंख्याक जिल्हा सचिव इरफान मनियार, ओबीसी सेलचे समाधान ठाकरे यांनी ना. वडेट्टीवार यांची भेट घेत त्यांना याप्रकरणी निवेदन देत चर्चा केली.

शासनाने कृषी आणि महसुल यांनी एकत्रीतपणे सुमारे 54806 हेक्टर बाधीत क्षेत्राचे 51 हजार 194 शेतकर्‍यांचे पंचनामे करुन तसा अंतीम अहवाल शासनाकडे दिला आहे. शेतकरी बांधवांचे प्रश्न तातडीने मार्गी लागणार असल्याचे मंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ. शिरीष चौधरी, नुतन जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, माजी खा. उल्हास पाटील, जळगाव शहर अध्यक्ष शाम तायडे, सेवादल जिल्हाध्यक्ष संजय पाटील, जळगाव तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, ज्ञानेश्वर कोळी, भडगाव शहर अध्यक्ष दिलीप शेंडे, भुषण पवार, आशुतोष पवार आदींची उपस्थिती होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here