रेशनच्या मालाचे धुळे – गोंदीया कनेक्शन?

गोंदीया (अनमोल पटले) : जळगाव खानदेशमार्गे गोंदीयाकडे जाणा-या त्या संशयास्पद ट्रकमधील तांदुळाचा साठा रेशनच्या मालाचाच असल्याचा निष्कर्ष जळगाव जिल्ह्यातील यावल पोलिसांनी काढला आहे. यावल पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिका-यांचा अभिप्राय मागवला आहे. मात्र अद्याप तसा काहीही अभिप्राय महसुल विभागाकडून आलेला नाही.

यावल पोलिसांच्या पथकाने संशयीतांच्या गोदामाची पाहणी केली असता त्यातील रिकाम्या पोत्यांवर शासनाचे सिम्बॉल आढळून आले आहेत. दोघा संशयीतांकडे धान्य खरेदी विक्रीचा कुठलाही परवाना आढळून आलेला नाही. त्यामुळे जप्त तांदुळाचा साठा हा रेशनचा असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी यावल पोलिसात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघे अटकेत आहेत.

निलेश राजेंद्र जैन व संतोष प्रभाकर पाटील अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. एमएच 18 एसी 847 क्रमांकाच्या ट्रकमधील सुमारे 30 टन तांदुळ गोंदीया येथील एका इंडस्ट्रीजमधे जादा दराने विक्रीसाठी जाणार असल्याची कबुली चालकाने यावल पोलिसांना दिली आहे. काळ्या बाजारातील तांदुळ घेणा-या गोंदीया जिल्ह्यातील संबंधीत व्यावसायीकाच्या गोटात खळबळ माजली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here