होमगार्ड जवान “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानीत

जळगाव : कोरोना महामारीच्या कालावधीत सर्व जनसामान्यांना घरातच थोपवून धरण्याची मोठी जबाबदारी पोलीस दलाकडे आली होती. या कालावधीत पोलिस दलावरील बंदोबस्ताचा ताण गृहरक्षक दलाच्या जवानांनी हलका केला होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर प्रत्येक वेळी पोलिसांच्या मदतीला कर्तव्याचा भार सहजतेने उचलाणा-या गृहरक्षक दलाच्या जवानांचा कोरोना योद्धा म्हणून नुकताच सन्मान करण्यात आला. सदर सन्मान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

कोरोना कालावधीत विनावेतन नि:स्वार्थ भावनेतून पोलीस दलाच्या खांद्याला-खांदा लावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणा-या गृहरक्षक दलाच्या जवानांच्या कार्याची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा होमगार्ड समादेशक तथा अपर पोलिस अधिक्षक जळगाव चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे हस्ते 140 गृहरक्षक (होमगार्ड) जवानांचा गौरवपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हा होमगार्ड समादेशक तथा अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डीवायएसपी (गृह) विठ्ठल ससे, दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत पाटील, आणि सहायक पोलीस उप निरीक्षक भास्कर पाटील, प्रदिप बडगुजर, श्रावण पगारे, प्रविण पाटील, अजय पाटील, नवजित चौधरी, राहूल बैसाणे, प्रमोद वाडीले, प्रशिक्षक राजेश वाघ, देवीदास वाघ, सोपानदेव पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, वायरलेस विभागाचे पोलिस उप निरीक्षक संजय मराठे, पोलिस कल्याण विभागाचे रावसाहेब गायकवाड, सतिश देसले यांनी सहकार्य केले. दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आभार व्यक्त केले. पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here