धान्य खरेदी केंद्राचे पालकमंत्री मलीक यांच्या हस्ते उद्घाटन

गोंदीया (अनमोल पटले) : दिपावलीपुर्वी आधारभुत धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन होणार असल्याची वचनपुर्ती खा. प्रफुल पटेल यांनी केली आहे. गोंदीया तालुक्यातील फुलचूर येथे शासकीय धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री नवाब मलीक यांच्या हस्ते संपन्न झाले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप धान्याची आधारभुत किमतीने खरेदी करण्यासाठी खा. प्रफुल पटेल प्रयत्नशिल होते. त्याकामी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु होता. त्यासाठी ते प्रशासनाच्या संपर्कात होते. संबंधीत मंत्र्यांसोबत त्यांची बोलणी सुरु होती.

या धान्य खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नवाब मलिक यांच्या समवेत माजी आमदार राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी नैना गुंडे, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, देवेंद्रनाथ चौबे, नरेश माहेश्वरी, नागेंद्रनाथ चौबे, रेखलाल टेंभरे, बिट्टू बिसेन, नंदू अग्रवाल, संजय अग्रवाल, देवांश चौबे, पियुष अग्रवाल प्रणय चौबे, भुवनेश चौबे, कचरु शर्मा, ओमप्रकाश पटले, राहुल गौतम, टेंभरे आदी पदाधिकारी हजर होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here