लॅपटॉपसह बॅग चोरणारा पोलिसांच्या तावडीत

जळगाव : रेल्वे आणि जिल्हापेठ पोलिसांच्या संयुक्त कारवाईत लॅपटॉपसह चोरी झालेली बॅग मुळ मालकास सुरक्षीतरित्या मिळाली आहे. बब्बू भैय्यालाल धुर्वे (39) रा. उमरखेडा खुर्द ता.जि. छिंदवाडा मध्य प्रदेश असे चोरट्याचे नाव असून त्याला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे.

जिशान अशपाक पिंजारी हा अमळनेर येथील तरुण शिक्षणासाठी नांदेड येथे गेला होता. दिवाळी सणानिमीत्त जिशान हा जळगावमार्गे अमळनेर जात होता. जळगाव बस स्थानकावर आल्यावर त्याची अमळनेरला जाणारी बस सायंकाळी साडे सात वाजता होती. त्याच्या ताब्यात चार बॅगा होत्या. त्यापैकी एक बॅग चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. मात्र नाईलाजाने तो ताब्यातील तिन बॅगांसह अमळनेर येथे गेला.

दरम्यान रेल्वे पोलिसांना रेल्वे स्टेशन परिसरात एक चोरटा संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याच्या ताब्यातील बॅगची रेल्वे पोलिस चौकीचे पोलिस उप निरीक्षक राजेंद्र पाटील, सहायक फौजदार राजेश पुराणिक, हे कॉ सचिन पाटील आदींनी चौकशी केली. अधिक चौकशी व तपासकामी त्यांनी जिल्हापेठ पोलिसांसोबत संपर्क साधत त्यांना रेल्वे पोलिस चौकीत बोलावून घेतले. संशयास्पद स्थितीत ताब्यातील चोरटा उडवाउडवीची उत्तरे देत असतांनात त्याच्या ताब्यातील बॅगची झडती घेण्यात आली.

त्याच्याकडील बॅगेत एक लॅपटॉप व नाव – मोबाईल क्रमांक असलेली एक चिठ्ठी आढळून आली. त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत त्या लॅपटॉपसह बॅगेचे फोटो पाठवण्यात आले. ती बॅग व लॅपटॉप पलीकडून बोलणा-या जिशान पिंजारी याने तात्काळ ओळखले. त्याला जळगावला बोलावून घेण्यात आले. त्याच्याकडून लॅपटॉप सह बॅगेची ओळख पटल्यानंतर चोरटा बब्बू धुर्वे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला. जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे स.पो.नि. महेंद्र वाघमारे, पो.ना. संदीप पाटील पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here