ऑर्केस्ट्रातील फरार नृत्यांगना व ग्राहकांचा शोध सुरु

सोलापूर : सोरेगाव येथील नागेश ऑर्केस्ट्रा डान्स बारवर शुक्रवारी रात्री कारवाई झाली. या कारवाई दरम्यान आठ नृत्यांगणा व जवळपास दहा ते पंधरा ग्राहक पलायन करण्यात यशस्वी झाले. फरार नृत्यांगणांसह ग्राहकांची माहिती घेण्याचे काम पोलिस करत आहेत.

सहायक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी केलेल्या कारवाईदरम्यान बारा नृत्यांगणा तसेच बारमालक, व्यवस्थापक, ग्राहक यांच्यासह तिस जणांना कारवाईनंतर सोडून देण्यात आले. या कारवाईत चार कार, पंधरा मोटार सायकली, 25 मोबाईल, रेकॉर्ड रजिस्टर, लॅपटॉप संगीत संच, डीव्हीआर जप्त करण्यात आले आहेत. या बारचा परवाना रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here