भाजप नेते अग्रवाल यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट

गोंदीया (अनमोल पटले) : राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी त्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी संपात उतरले आहेत. शासनाने काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी गोंदीया व तिरोडा या आगारातील कर्मचारी आंदोलनकर्ते पुन्हा संपात सहभागी झाले आहेत. 31 ऑक्टोबरपासून पुकारण्यात आलेल्या आंदोलनस्थळी भाजपचे नेते गोपालदास अग्रवाल यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

एसटी कर्मचार्‍यांच्या रास्त मागण्यांची दखल घेत त्यांना शासकीय कर्मचा-यांप्रमाणे सोयी सवलती मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रकांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी राज्य सरकारप्रमाणे महागाई व घरभाडे भत्ता मिळण्याची मागणी केली आहे. वार्षिक वेतनवाढीचा दर तिन टक्के व सणाची उचल साडे बारा हजार रुपये दिवाळीपुर्वी मिळण्याची मागणी चालक, वाहकांनी केली आहे. दिवाळी कालावधीत संप पुकारल्याने महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here