मावशीने आवळला पुतण्याचा गळा

काल्पनिक छायाचित्र

नांदेड : नात्याने सख्खी मावशी असलेल्या महिलेने तेरा वर्षाच्या बालकाचा दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. रविवारी दुपारी नांदेड जिल्ह्यातील माळाकोळीनजीक कामजळगेवाडी (ता. लोहा) येथे घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे.

बालकाची हत्या करणा-या महिलेने स्वत: माळाकोळी पोलिस स्टेशनला हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे. हत्येचे नेमके कारण समजले नसून सुयोग रामंचद्र नागसकरे (13) असे हत्या झालेल्या बालकाचे नाव आहे. माळाकोळी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. माणीक डोके पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here