रामचंद्रच्या पत्नीचा गणेशसोबत असे मधुचंद्र!— हत्येप्रकरणी चौघांच्या नशिबी कोठडीचा चंद्र!!

औरंगाबाद : रामचंद्र रमेश जायभाये आणि मनिषा जायभाये हे दोघे पती पत्नी होते. बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रामचंद्रचे औरंगाबाद येथील मनिषासोबत लग्न झाले होते. मेहनती असलेला रामचंद्र कामधंद्याच्या शोधात औरंगाबाद येथे आला. औरंगाबाद येथे त्याला कामधंदा देखील मिळाला. माहेरचे असलेल्या औरंगाबादला कामधंदा मिळाल्याने रामचंद्रची पत्नी मनिषा मनोमन भलतीच खुष झाली. बुलढाणा जिल्ह्यातील सासरवाडी सोडून तिला माहेरी औरंगाबाद येथे राहण्याची संधी चालून आली होती.

औरंगाबाद येथे कामधंदा मिळाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस तो पत्नी मनिषासोबत सासरी मुक्कामी राहीला. बघता बघता त्याने सासरवाडीतच मुक्काम ठोकला. पतीसोबतच माहेरी राहण्यास मिळाल्याने मनिषा अजूनच खुष झाली. सासरी राहण्यापेक्षा तिला पतिसोबतच माहेरी राहण्यात जास्त सुख  मिळत होते. दरम्यान रामचंद्रला ड्रायव्हिंग करण्याचे काम मिळाले. त्या कामात देखील रामचंद्र खुष होता. रामचंद्र मेहनती तरुण होता. त्यामुळे मिळेल ते काम तो आनंदाने करत होता. मिळालेल्या ड्रायव्हिंगच्या कामाच्या माध्यमातून त्याचे काही मित्र तयार झाले होते. त्यापैकी गणेश उर्फ समाधान सुपडू फरकाडे हा एक होता. गणेश फरकाडे हा सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील रहिवासी होता. गणेशसोबत त्याचे जवळचे संबंध निर्माण झाले होते.  

पिसादेवी परिसरात सासरी राहणा-या रामचंद्रकडे त्याचा मित्र गणेशचे अधूनमधून येणे सुरु झाले. दरम्यान गणेश व मनिषा यांची नजरानजर झाली. या नजरेच्या खेळात गणेशच्या मनात मित्र रामचंद्रची पत्नी मनिषा भरली. “सुंदरा मनात भरली” असे मनातल्या मनात म्हणणा-या गणेशच्या स्वप्नात मनिषा रोजच येऊ लागली. तो मुद्दाम काहीतरी कामाच्या बहाण्याने रामचंद्रच्या गैरहजेरीत त्याला भेटण्यासाठी येऊ लागला. त्या निमीत्ताने त्याची मनिषासोबत भेट होऊ लागली. गणेशच्या मनातील हावभाव आणी चालढाल मनिषाने ओळखली होती. ती त्याला चढत्या क्रमाचा प्रतिसाद देऊ लागली. तिला आता पती रामचंद्र पेक्षा गणेश जवळचा वाटू लागला. ती माहेरीच रहात असल्यामुळे ती मुक्त होती. सासरी रहात असलेल्या रामचंद्रवर मात्र अनेक प्रकारची बंधने होती. त्यामुळे मनिषाला चांगलेच फावले होते.

सुरुवातीला नजरेचा खेळ, नंतर संभाषण, त्यानंतर सहवास व सरतेशेवटी स्पर्श असा दोघांनी टप्पा गाठला. या टप्प्यानंतर अजून एक पल्ला त्यांनी गाठला. त्यांनंतर त्यांना स्वर्ग दोन बोटे उरला होता. रामचंद्रच्या गैरहजेरीत दोघा प्रेमींना कुणाचे बंधन राहिले नव्हते. मिळालेल्या सहवासाचा दोघे जण पुरेपुर लाभ घेत होते. माहेरी पतीच्या गैरहजेरीत राहणा-या मनिषाला कुणाचे बंधन नव्हते. त्यामुळे ती गणेशकडून हवे तसे सुख मिळवून घेत होती. त्यात गणेशला देखील हवे ते मिळत होते. बघता बघता गणेश व मनिषा एकमेकांच्या मोठ्या प्रमाणात आहारी गेले. दोघे जण पती पत्नीप्रमाणे राहू लागले व सोबत फिरायला देखील जावू लागले. हा सर्व प्रकार रामचंद्रच्या गैरहजेरीत बिनबोभाट सुरु होता. याचा परीणाम असा झाला की तिचे पती रामचंद्रकडे दुर्लक्ष होऊ लागले. तिच्या वागण्यात व बोलण्यात झालेला बदल रामचंद्रला जाणवू लागला. तो मनातून तिच्यावर नाराज झाला होता. मात्र सासरवाडी असल्यामुळे त्याला फारसे तिच्यावर रागावता येत नव्हते. इकडे मनिषा व गणेशची तब्येत सुधारली होती.

काही दिवसांनी मात्र परिस्थिती बदलली. रामचंद्रचे काम कमी झाले. काम कमी झाल्यामुळे तो जास्त वेळ घरीच राहू लागला. तो घरी राहू लागल्यामुळे गणेश व मनिषा यांची अडचण निर्माण झाली. मनिषाला भेटण्यासाठी आलेल्या गणेशला समोर रामचंद्रचा साक्षात्कार झाल्यानंतर तो मनोमन नाराज राहू लागला. केवळ औपचारीक गप्पा केल्यानंतर तो रिकाम्या हाती परत जाऊ लागला. रामचंद्रला देखील दोघांवर संशय येऊ लागला. तो दोघांवर आता लक्ष ठेवत होता. त्यामुळे दोघे प्रेमी तळमळ करत होते. प्रियकर येतो आणि केवळ बघून परत जातो हा प्रकार तिला अस्वस्थ करत होता. गणेशच्या सहवासाची तिला सवय झाली होती. मात्र रामचंद्र घरी रहात असल्यामुळे तिला तिच्या इच्छेला मुरड घालावी लागत होती. गणेशची देखील अवस्था फार काही वेगळी नव्हती. आता काहीही करुन रामचंद्रला घराबाहेर काढावे लागेल असा दोघांनी मनाशी विचार आणि निश्चय केला. दोघे भेटीसाठी आतुर झाले होते. बघता बघता रामचंद्र दोघांना अडचणीचा वाटू लागला. हा अडसर कसा दुर होईल या विचाराने दोघे झपाटले.

संशयीत आरोपी राहुल, निकीतेश आणि गणेश

त्यांनी एक वेगळीच योजना आखली. त्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात रामचंद्रला खोट्या गुन्ह्यात अडकण्याची योजना तयार करण्यात आली. गावठी कट्टा बाळगल्याच्या गुन्ह्यात रामचंद्रला अटक करण्यात आली . या गुन्ह्यात अडकल्यानंतर रामचंद्रला अडीच महिने न्यायालयीन कोठडीत जावे लागले. या अडीच महिन्याच्या कालावधीत गणेश व मनिषाला मुक्त वातावरण मिळाले. दोघांनी या संधीचा चांगला उपभोग घेतला. रामचंद्र आता पुन्हा येवूच नये असे त्यांना वाटत होते. मात्र बोलता बोलता अडीच महिन्याचा कालावधी भरकन निघून गेला. तो बाहेर आला.

रामचंद्र जेलच्या बाहेर आल्यामुळे पुन्हा दोघांच्या भेटीगाठीवर नियंत्रण आले. आता पुन्हा रामचंद्रचे करायचे काय असा विचार दोघे जण करु लागले. या विचारातून दोघांनी मिळून रामचंद्रला या जगातून कायमचे बाद करण्याचे ठरवले. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने रामचंद्रची हत्या करण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी गणेशने त्याच्या दोन साथीदारांना तयार केले. रामचंद्रच्या हत्येसाठी एक लाख रुपयांची सुपारी देण्याचे ठरवण्यात आले. राहुल आसाराम सावंत (रा. सातारा परिसर) व निकितेश अंकुश मगरे (रा. बालाजीनगर, मोंढा नाका) यांना सोबत घेत हत्येचा कट आखण्यात आला. या कामासाठी विस हजार रुपयांची अग्रिम राशी देण्यात आली.

जिवनसाथी असलेली पत्नीच पती रामचंद्रच्या जिवावर उठली होती. त्यामुळे प्रियकर गणेशसह दोघा भाडोत्री मारेक-यांना त्याच्या हत्येची संधी मिळणार होती. 20 ऑक्टोबरच्या रात्री रामचंद्रची हत्या करण्याचे निश्चीत करण्यात आले. त्या रात्री काम आटोपून रामचंद्र घरी परत आला. रात्री अकरा वाजेच्या सुमारास रामचंद्र गाढ झोपेत असल्याची मनिषाने खात्री करुन घेतली. झोप तिच्यापासून दुर पळाली होती. रामचंद्र गाढ झोपेत असतांना तिच्या घराबाहेर तिचा प्रियकर व दोघे भाडोत्री मारेकरी असे तिघे जण दबा धरुन बसले होते. ते सर्व जण तिच्या दार उघडण्याची वाट बघत होते. काही वेळाने मनिषा चोरपावलांनी उठली. तिने हळूच दरवाजा उघडला. बाहेर पुर्ण तयारीनिशी असलेल्या गणेश फरकाडे याच्यासह राहुल सावंत व निकितेश मगरे असे तिघे जण घरात आले.

मयत रामचंद्र

मनिषा, गणेश व निकितेशने मिळून रामचंद्रचे हात – पाय धरुन ठेवले. राहुलने रामचंद्रचे तोंड दाबून ठेवत त्याच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले. रामचंद्र ठार झाल्याचे दिसताच लक्षात त्यांनी त्याला सोडले. घरात मृतदेह ठेवणे योग्य नसल्याचे लक्षात घेत त्याची तातडीने विल्हेवाट लावण्याचे देखील त्यांनी ठरवले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी तो उचलत घराबाहेर आणला. रात्रीच्या काळोखात सर्वजण निद्रीस्त अवस्थेत असतांना त्यांनी रामचंद्रचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. त्यानंतर सर्वजण तेथून पसार झाले.

दुस-या दिवशी 21 ऑक्टोबरच्या सकाळी रामचंद्रचा मृतदेह पिसादेवी नाल्यात परिसरातील लोकांना आढळून आला. या घटनेची माहिती चिकलठाणा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच स.पो.नि. गजानन जाधव व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसह परिसरातील लोकांच्या दृष्टीने रामचंद्रचा मृतदेह अनोळखी होता. मात्र त्याच्या खिशातील आधार कार्डाच्या आधारे त्याची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. तपासकामाच्या दृष्टीने दोन पथके तयार करण्यात आली. मयताची पत्नी मनिषा जायभाये हिला ताब्यात घेतल्यानंतर तिचा प्रियकर गणेश उर्फ समाधान सुपडू फरकाडे याचे नाव पुढे आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर राहुल आसाराम सावंत (सातारा परिसर) आणी निकीतेश अंकुश मगरे (बालाजी नगर मोंढा नाका) यांची नावे पुढे आली. मनिषाचा प्रियकर गणेश फरकाडे याने दोघांना रामचंद्रची हत्या करण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे उघड झाले. त्यापैकी विस हजार रुपये अ‍ॅडव्हांस देखील देण्यात आला होता.

अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याचे बघून मनिषाचा प्रियकर गणेश याने दोघा साथीदारांना सोबत घेत रामचंद्रची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. मयत रामचंद्रचा भाऊ कृष्णा रमेश जायभाये याच्या फिर्यादीनुसार याप्रकरणी चिकलठाणा पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांना अटक करण्यात आली. सहायक निरीक्षक गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी ढगारे, अशोक रगडे, अश्विनी कुंभार, अजिनाथ शेकडे, बाबासाहेब मिसाळ, सुरेश साळवे, रवींद्र साळवे, दीपक देशमुख, दीपक सुरोशे, विशाल नरवडे, सुग्रीव घुगे, विशाल लोंढे, गणेश खरात, परी कृष्णा बरबडे, सचिन रत्नपारखे, तनुजा गोपाळघरे, ज्योती जैस्वाल, सीमा घुगे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here